एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
अत्याचाराला बळी पडलेली महिला घरातून बाहेर पडताना एकटी का गेली, एखाद्या मुलाला समवेत का घेऊन गेली नाही, असे वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या महिला सदस्याचा नगरमध्ये निषेध करण्यात आला. या सदस्याची हकालपट्टी करण्याची मागणीही करण्यात आली.
भारतीय महिला फेडरेशनच्या नगर जिल्ह्याच्या अध्यक्षा डॉ.कमर सुरूर, उपाध्यक्षा शोभाताई शिंदे, सेक्रेटरी भारती न्यालपेल्ली, सहसेक्रेटरी सगुना श्रीमल, निर्मला खोडदे, सुजाता वागसकर, उज्वला वाकळे, संगीता कोंडा, रेणुका अंकाराम, भाग्यलक्ष्मी गडड्म यांनी संयुक्त पत्रक काढून महिला आयोगाच्या संबंधित सदस्यांची हकालपट्टीची मागणी केली आहे.
याबाबतची माहिती अशी की, राष्ट्रीय महिला आयोगातून चंद्रमुखी देवी यांची हकालपट्टी करण्याची मागणी भारतीय महिला फेडरेशनने केली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या चंद्रमुखी देवी यांनी बलात्कार करून मारून टाकलेल्या बदांयू येथील अंगणवाडी सेविकेच्या घरी भेट देताना केलेल्या वक्तव्याचा फेडरेशनसह संघटनांनी निषेध केला आहे. चंद्रमुखी देवी म्हणाल्या की, जर ती महिला एकटी न जाता बरोबर घरातल्या एखाद्या मुलाला घेऊन गेली असती तर तिच्यावर असा प्रसंग ओढवला नसता, असे त्यांनी व्यक्तव्य केले आहे. पण, ज्या महिला आयोगाने स्त्रियांच्या अधिकाराचे रक्षण करायचे, त्याच महिला आयोगाच्या सदस्या जाहीरपणे गुन्हेगाराकडे दुर्लक्ष करून उलट त्याच्या दुष्कृत्याची जबाबदारी पीडितेवर टाकून मोकळ्या होत आहेत, हे खरोखर लाजिरवाणे आहे. त्यांच्या या वक्तव्याचा हेतु मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या सत्तेत स्त्रियांना भेडसावणाऱ्या असुरक्षिततेच्या भयानकतेवर पडदा घालण्याचाच आहे, हे स्पष्ट आहे. राष्ट्रीय महिला आयोगाची सदस्य सरंजामी आणि पुरुषप्रधान विचारसरणीचा प्रचार करीत आहेत, हे धक्कादायक आहे. त्यांना ताबडतोब महिला आयोगातून काढून टाकावे अशी फेडरेशनने मागणी केली आहे.

Post a Comment