शेतकऱ्यांनो, तूर विकायची? जिल्ह्यात १३ खरेदी केंद्रे सुरू


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

शासनाद्वारे हमीभावाने तूर खरेदी अहमदनगर जिल्ह्यातील १३ केंद्रांवर केली जाणार असून, तूर खरेदी नोंदणी करण्यासाठी शेतकर्‍यांना आवाहन करण्यात आले आहे. या केंद्रांवर तूर ६ हजार रुपये प्रति क्विंटल या हमीभावाने खरेदी केली जाणार आहे.

केंद्र शासन आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत तूर खरेदीसाठी नोंदणी करण्यासंदर्भातील आवाहन जिल्हा मार्केटींग अधिकारी हनुमंत पवार यांनी केले आहे. जिल्ह्यात २८ डिसेंबरपासूनच तूर खरेदीसंदर्भात शेतकरी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्यासाठी जिल्ह्यात १३ खरेदी केंद्रे प्रस्तावित आहेत. यापैकी ११ खरेदी केंद्रांवर शेतकरी नोंदणी सुरू करण्यात आली आहे. मात्र, शेतमाल नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी तलाठी पीक पेराचा उल्लेख असलेला 8अ, सात-बारा उतारा, आधारकार्डाची छायांकित प्रत, बँक पासबुकची छायाप्रत सादर करणे आवश्यक आहे. बँक पासबुकची छायांकित प्रत सादर करताना रद्द केलेला धनादेश अथवा बँक खात्याबाबत पूर्ण माहिती असलेले बँक स्टेटमेंट सादर करावे. हे बँक खाते बंद अथवा जनधन योजनेतील नसावे याची दक्षता संबंधितांनी घ्यावी. ज्या तालुक्यातील क्षेत्र आहे, त्याच तालुक्यातील खरेदी केंद्रावर शेतकर्‍यांनी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या केंद्रांवर तूर ६ हजार रुपये प्रति क्विंटल या हमीभावाने खरेदी केली जाणार आहे.

खरेदी केंद्र व केंद्रावरील भ्रमणध्वनी असे : 
राहुरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, राहुरी (भ्रमणध्वनी-9665722815). 
संगमनेर तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, संगमनेर (भ्रमणध्वनी- 9850319568). 
श्रीगोंदा तालुका आरोही बहुउद्देशीय सह संस्‍था, श्रीगोंदा (भ्रमणध्वनी- 9011957878). 
कर्जतकर फार्मर प्रोडुयसर कंपनी, कर्जत (भ्रमणध्वनी- 9503031010). 
यशवंत मल्टीपर्पज को ऑप सोसायटी, जामखेड (भ्रमणध्वनी- 7218412412), 
शिवरत्न मल्टीपर्पज को ऑप सोसायटी, खर्डा, ता.जामखेड (भ्रमणध्वनी- 9422200001). 
जयभगवान मल्टीपर्पज को ऑप सोसायटी, पाथर्डी (भ्रमणध्वनी- 8329404135). 
शेवगांव तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, शेवगांव (भ्रमणध्वनी- 9011541646). 
कृषी उत्पन्न बाजार समिती, अहमदनगर (भ्रमणध्वनी -9021202301), 
श्रीराम बी-बियाणे उत्‍पादक कंपनी, साकत, ता. नगर (भ्रमणध्वनी- 8275391207). 
जय किसान बहुउद्देशीय सह संस्‍था मांडवगण, ता. श्रीगोंदा (भ्रमणध्वनी- 9422223719).

Post a Comment

Previous Post Next Post