एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
सत्तेमुळे सर्व काही होते व काही केले तरी चालते, अशी मानसिकता जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत मतदारांनी मोडून काढली, अशी भावना नगरचे भाजप खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी व्यक्त करताना, कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांना अप्रत्यक्ष टोला लगावला.
कर्जत तालुका विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदार संघातून विखे यांचे कट्टर समर्थक अंबादास पिसाळ अवघ्या एक मताने विजय झाले आहेत. त्यांना 37 मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी पराभूत उमेदवार मीनाक्षी साळुंके यांना 36 मध्ये मिळाली आहेत. या निकालाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना खासदार विखे यांनी पिसाळ यांचे अभिनंदन केले व भाजपचा हा उमेदवार प्रा. राम शिंदे व तालुकाध्यक्ष गावडे यांच्यासह सर्व मतदारांच्या सहकार्याने विजयी झाल्याची भावना व्यक्त केली.
यानिमित्ताने राजकीय टीकाटिप्पणी करताना ते म्हणाले, कर्जतची निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती, पण ती आम्ही केली नव्हती. सहकारी बँक आहे त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आमचे लोक उतरले होते, पण सत्तेचा उपयोग करून व सत्तेमुळे सर्व काही होते अशीच काही जणांची भावना होती. सत्तेमुळे काहीही केले तरी चालते असा दबाव व प्रेशर असतानाही कर्जत मध्ये पिसाळ विजय झाले, असा दावा करून खासदार विखे यांनी अप्रत्यक्षपणे आमदार पवार यांना टोला लगावला. मोठ्या शक्तीसमोर विरोध उभारून पिसाळ यांच्यासह नगर तालुक्यात व जिल्ह्यात सत्तेचा दबाव झुगारून देण्याचे काम झाले आहे. सर्वसामान्य माणसे व पदाधिकारी तळागाळातील शेतकऱ्यांसाठी काम करतील, हे या निकालातून सिद्ध होते, असेही विखे यांनी स्पष्ट केले.
Post a Comment