एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या नगर तालुका विकास सोसायटी मतदार संघातून विजय झालेले माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना जिल्ह्यातील दिग्गज राजकीय लोकांवर सूचक टीका केली. या कारखानदार मंडळींवर लवकरच गौप्यस्फोट करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. त्यामुळे आता कर्डिले जिल्ह्यातील राजकारणावर काय बोलतात, याची उत्सुकता वाढली आहे.
रविवारी निवडणुकीची मतमोजणी झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, आम्ही मागील पाच वर्षात दुष्काळी भागातील शेतकरी, दूध उत्पादक व महिला बचत गटांना दिलासा देण्याचे काम बँकेच्या संचालक पदाच्या माध्यमातून केले. परंतु ते जिल्ह्यातील कारखानदारांना भावले नाही. त्यामुळे मी संचालक होऊ नये, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मला पाडण्याचा आटोकाट प्रयत्न जिल्ह्यातील प्रस्थापित मंडळींनी केला. परंतु तो अपयशी ठरला आहे. माझा विजय झाला असून यापुढेही जिरायत भागातील शेतकऱ्यांसाठी तसेच दूध उत्पादक व महिला बचत गटांसाठी सातत्याने आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. आमची यापुढे भूमिकाही या शेतकऱ्यांना साथ देण्याची राहणार आहे, असेही कर्डिले म्हणाले.
दरम्यान, जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत राज्यातील आघाडी सरकारच्या विरोधात भाजप स्वतंत्र पॅनल करणार होते. परंतु कर्डिले यांनी विकास आघाडीच्या सहमती एक्सप्रेसमध्ये सहभाग घेतला. यामुळे बँकेच्या 21 जागांपैकी तब्बल 17 जागा बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच बिनविरोध झाल्या. परंतु शिवाजी कर्डिले यांना मात्र निवडणूक लढवावी लागली. त्यांची जागा बिनविरोध झाली नाही, याची खंत त्यांना आहे. निवडणुकीआधी एक दिवस आभार सभेत बोलतानाही त्यांनी जिल्ह्यातील राजकारण्यांनी माझ्यावर निवडणूक लादली, अशी टीका केली होती. तसेच त्यांनी मतमोजणी झाल्यावर व विजयी झाल्यावर पुन्हा जिल्ह्यातील राजकारण्यांवर टीका केली व लवकरच जिल्ह्यातील कारखानदार मंडळींनी बँकेचे कसे फायदे घेतले, याचा गौप्यस्फोट करणार असल्याचे सूचक उद्गार काढले. जिल्ह्यातील दूध संघांना व कारखान्यांना बँकेद्वारे केलेल्या आर्थिक मदतीच्या विषयासह अन्य विविध मुद्द्यांवर कर्डिले स्पष्टपणे बोलणार असल्याचे समजते. त्यामुळे आता त्यांच्या गौप्यस्फोटाची उत्सुकता जिल्ह्यात आहे.

Post a Comment