स्विफ्ट कार चक्काचूर.. अपघातात 5 ठार


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात नगर - औरंगाबाद महामार्गावरील देवगड फाट्यानजिक झालेल्या स्विप्ट कार व ट्रॅव्हल्सच्या भिषण अपघातात कारमधील पाच जण जागीच ठार झाल्याची दुर्दवी घटना घडली. हा अपघात इतका भिषण होता की, या अपघातात स्विप्ट कारचा चक्काचुर झाला. सोमवार (दि.२२) रोजी पहाटे दोन वाजेच्या दरम्यान अपघात घडला.

मध्यरात्री २ च्या सुमारास अहमदनगरकडून औरंगाबादकडे जात असलेल्या ट्रॅव्हल बस (क्रमांक एमएच १९ वाय ७१२३) व औरंगाबादकडून नगरच्या दिशेने जात असलेल्या स्विप्ट कार (क्रमांक एमएच २१ बीएफ ७१७८) यांच्यामध्ये देवगड फाट्याजवळ समोरासमोर धडक झाली. यात कारमधील पाच जण जागीच ठार झाले. मयत जालना जिल्ह्यातील मंठा येथील असल्याचे समजते. स्वीप्ट कार ट्रॅव्हल्सच्या समोरील बाजूस घुसल्याने स्वीप्ट कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

अपघाताची माहिती समजताच पोलीस उपनिरीक्षक भरत दाते, पोलिस नाईक अशोक नागरगोजे, पोलीस नाईक बबन तमनर, पोलीस कॉन्स्टेबल दिलीप कुऱ्हाडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवुन स्थानिकांच्या मदतीने मदतकार्य केले व जखमींना ग्रामीण रुग्णालय नेवासा फाटा येथे हलवले. परंतु सर्व ५ ही जण उपचारापूर्वीच मयत झाले. पुढील कार्यवाही नेवासा पोलीस करत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post