राजकारणासाठी नगरची बदनामी; आमदार जगतापांनी व्यक्त केली खंत

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

''शहरामध्ये विविध विकासकामे सुरू असल्यामुळे आपल्या शहराचे विस्तारीकरण चारही बाजूने वाढत आहे. मात्र, काही लोक स्वतःचे राजकारण करण्यासाठी शहराला नावे ठेवण्याचे काम करतात. आपणही त्यांच्या हा मध्ये हा मिळवतो. सोशल मिडियाच्या माध्यमातून राज्यभर शहराची बदनामी करतो'', अशी खंत शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी येथे व्यक्त केली. ''मात्र, असे न करता सर्वांनी सकारात्मक दृष्टिकोनातून शहरावर प्रेम करावे. विकास कामामध्ये सामील व्हावे'', असे आवाहन आ. जगताप यांनी केले व शहरामध्ये उद्योजकाला व कामगारांना पोषक वातावरण निर्माण झाले असल्याचा दावाही त्यांनी केला.

एमआयडीसीतील आयटी पार्कमधील कंपन्यांच्यावतीने ९0 युवकांना नेमणूक पत्र देण्याच्या कार्यक्रमात आ. संग्राम जगताप बोलत होते. यावेळी डॉ. एस. एस. दीपक, डॉ. रवींद्र मिरगणे, उद्योजक हरजितसिंह वधवा, किरण भंडारी, राजेंद्र काळे, विजयकुमार पादीर, अॅड. शिवाजी कराळे, विक्रम वाडेकर, बांधकाम व्यावसायिक अनिल मुरकुटे, उद्योजक राजेंद्र कटारिया, डॉ. रणजीत सत्रे, संजय बंदिष्टी, राजेश आठरे, सुमित लोढा, नगरसेविका शीतल जगताप, डॉ. बबन डोंगरे, माधवराव लामखडे, दत्ता पाटील सप्रे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी फास्टट्रॅक इन्फोटेक, फोर्थ ट्रक इन्फोटेक, पीएम ट्रॅक, आयान क्लोबल सर्व्हिसेस, आयडिस टू इम्पॅक्टस्‌, विष्णू ट्रेडींग कंपनी, वाई टेक्नोलॉजी प्रा. लि., केएसआयटी सोल्यूशन्स आदी कंपन्यांनी शहरातील ९0 युवकांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. याचबरोबर आता सुमारे ४00 युवक आयटी पार्कमध्ये काम करत आहे. यावेळी नगरसेवक अविनाश घुले, विनित पाऊलबुद्धे, समद खान, सुनील त्रिंबके, बाळासाहेब पवार, निखिल वारे, मुजाहिद कुरेशी, अजिंक्य बोरकर, विपूल शेटीया, अमोल गाडे, प्रकाश भागानगरे, डॉ. सागर बोरुडे, धनंजय जाधव, अॅड. राजेश कातोरे, सचिन जाधव, दिनेस छाबरिया, हनुमंत कातोरे, महेश कांडेकर, किरण कातोरे, संभाजी पवार, राजेश आठरे, सागर सप्रे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. जगताप म्हणाले, आयटी पार्कच्या माध्यमातून युवकांना आशेचे किरण निर्माण करुन दिले आहे. विकासकामामध्ये सर्वात मोठा भाग म्हणजे रोजगार आहे. यासाठी आयटी पार्कच्या माध्यमातून काम करत आहे. गेल्या २७ वर्षापासून दुर्लक्षित पडलेले आयटी पार्क सुरु व्हावे, यासाठी २0१९ पासून प्रयत्न करत आहे. राज्याबरोबरच देशामधील उद्योजक व कंपन्यांशी चर्चा केली. आयटी पार्कमध्ये कंपन्यांनी आपले कामही सुरु केले. त्यानंतर कोरोनाच्या संकटामुळे आपल्याबरोबर देशभर अनेक युवक बेरोजगार झाले. मात्र आयटी पार्कमधील २५०0 युवकांना रोजगार मिळत होता. आता राज्यभरातील विविध कंपन्या स्वत:हून संपर्क साधत आहे. आम्हाला आयटी पार्कमध्ये जागा देण्याची त्यांची मागणी आहे. त्यामुळे नवनवीन कंपन्या नगरमध्ये येत आहेत. यामुळे अनेक युवकांना रोजगार मिळवून स्वत:च्या पायावर उभे राहता येईल, असा विश्वासही आ. जगताप यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना डॉ. दीपक यांनी आ. जगताप यांच्या कामाचा गौरव केला. ते म्हणाले की, आ. संग्राम जगताप यांनी कमी वयात इच्छाशक्तीच्या जोरावर सर्वांना बरोबर घेऊन नगर शहराच्या विकासाला चालना देण्याचे काम केले आहे. कुठल्याही अडचणीच्या काळामध्ये आ. जगताप हे धावून येणारे आमदार आहेत. आमदारांचे काम काय आहे, हे संग्राम जगताप यांनी शहराबरोबरच राज्याला दाखवून दिले आहे, असे ते म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post