जरे हत्याकांड : पाच आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल; बोठेला पकडल्यावर पुरवणी दोषरोपपत्र


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अहमदनगर येथील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या खून प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच आरोपीविरूद्ध पारनेरच्या न्यायालयात तब्बल दीड हजार पनांचे दोषारोपपत्र पोलिसांनी शुक्रवारी दाखल केले. दरम्यान, या खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार व मागील सुमारे 3 महिन्यापासून फरार असलेला मुख्य आरोपी पत्रकार बाळ ज. बोठे विरूद्धनंतर पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले जाणार आहे, तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी पकडलेल्ल्या 5 आरोपींविरुद्ध दोषरोप पत्र दाखल केले आहे.

रेखा जरे प्रकरण दोषारोपत्र दाखल
यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या करणा-या पाच आरोपींविरोधात तपासी अधिकारी तथा उपविभागिय अधिकारी अजित पाटील यांनी तब्बल १ हजार ५०० पानांचे चार्जशिट (दोषारोपपत्र) (रेग्युलर क्रिमिनल केस क्र.१४८/२०२१) पारनेर न्यायालयात सादर केल्याचे वकील संकेत ठाणगे यांनी सांगितले. जरे यांच्या हत्येचा मुख्य सुत्रधार पत्रकार बाळ बोठे अद्यापही फरार असल्याने त्याच्याविरोधात तो अटक करण्यात आल्यानंतर स्वतंत्र पुरवणी दोषारोपपत्र (चार्जशीट) सादर करण्यात येणार असल्याचे अजित पाटील यांनी सांगितले.

त्या फोटोवरून लागला छडा
गेल्या ३० नाहेंबर रोजी नगर पुणे महामार्गावर जातेगाव घाटात रेखा जरे यांची गळा चिरून निघुन हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी जरे यांच्या आईने फिर्याद दाखल केल्यानंतर अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.जरे यांच्यावर हल्ला करणा-या दोघांपैकी एकाचा फोटा जरे यांच्या मुलाने काढला होता. याच फोटोवरून पोलिसांनी दोघाही आरोपींना तात्काळ जेरबंद केले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहीतीनुसार आणखी तिघांना अटक करण्यात आली. त्यांची कसून चौकशी करण्यात आली असता बाळ बोठे हा रेखा जरे यांच्या हत्येचा मुख्य सुत्रधार असल्याची माहीती पुढे आली.सागर भिंगारदिवे मार्फत त्याने जरे यांच्या हत्येची सुपारी दिली होती. त्यानंतर मोबाईल सीडीआरवरून रेखा जरे यांच्या हत्येचा बोठे हाच सुत्रधार असल्याचे स्पष्ट झाले होते. पाच आरोपी अटक करण्यात आल्यानंतर मुख्य आरोपी बोठे हा आजूनही फरारच आहे. त्याच सत्र न्यायालय, उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे. आता त्याने सर्वोच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज सादर करण्याची तयारी सुरू केली आहे.

यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या नगर पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात झालेल्या हत्येप्रकरणी गं.भा. सिंधूबाई सुखदेव वायकर (वय ६० रा. माळीबाभळगांव ता. पाथर्डी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सिंधूबाई यांचे जावई भाउसाहेब जरे हे येरवडा येथे जेल पोलिस असून त्यांना रूणाल वय २४ व कणाल वय 20 ही दोन मले आहेत.

गुडघ्याचा त्रास असल्याने तसेच त्या एकटया राहत असल्याने उपचार कामी पुणे येथील डॉ. सचिन तपस्वी यांच्याकडे जाण्याचे निश्चित झाल्याने १५ दिवसांपूर्वीच त्या मुलगी रेखा यांच्याकडे नगर येथे आल्या होत्या.

दि.३० रोजी डॉक्टरांची अपॉईंटमेट मिळाल्याने सकाळी सिंधूबाई, रेखा जरे, त्यांचा मुलगा कुणाल तसेच विजयमाला रमेश माने हे रेखा जरे यांची सॅन्ट्रो कंपनीची गाडी (क्र. एम एच १२ ई जी ९१४६) ने सकाळी सव्वासात वाजता पुण्याला जाण्यासाठी नगर येथून निघाले. पुण्यात पोहचल्यानंतर विजयमाला माने यांना येरवडा परिसरात सकाळी साडेदहा वाजता सोडून सिंधूबाई, रेखा जरे व कुणाल हे डॉ. सचिन तपस्वी यांच्या रूबी हॉलजवळील हॉस्पिटलला सकाळी ११. ४५ च्या दरम्यान पोहचले. दुपारी ३.४५ वाजता तेथील उपचार संपल्याने तेथून त्या बाहेर आल्या. त्यावेळी तेथे रूणाल जरे, आकांक्षा जरे, रूणालचा मित्र पुष्कर, विजयमाला माने हे हजर होते. तेथून रूणालच्या अ व्हीएटर दुचाकीवर रूणाल व त्याचा मित्र बसला. तर सॅन्ट्रोमध्ये इतर सदस्य बसले.

पुणे स्टेशन येथे आल्यानंतर नियोजन बदलले. तेथून अॅव्हीएटर गाडीवर रेखा जरे व त्यांची सुन आकांक्षा या रविवार पेठ येथे खरेदीसाठी गेल्या. तर सिंधूबाई, रूणाल, कुणाल, पुष्कर व विजयमाला माने हे सॅन्ट्रो गाडीतून खराडी बायपास येथील तुलसी हॉटेल येथे जेवणासाठी पोहचले. तेथे रेखा जरे व त्यांची सुन आकांक्षा आल्यानंतर त्यांचेही जेवण झाले. तेथून ४ वाजून ४५ मिनिटांनी रेखा जरे, सिंधूबाई, विजयमाला माने, कुणाल हे नगरकडे सॅन्ट्रोमधून निघाले.

परतीच्या प्रवासातही रेखा जरे याच गाडी चालवित होत्या. त्यांच्या शेजारच्या सिटवर विजयमाला माने, रेखा जरे यांच्या पाठीमागे सिंधूबाई तर माने यांच्या पाठीमागे कुणाल जरे बसलेला होता. त्यांची गाडी जातेगाव घाट येथे आली असता पाठीमागून काळया रंगाची मोटारसायकल (क्र. एम एच १७ - २३८०) ही आली. मोटारसायकलस्वाराने कट मारून सॅन्ट्रोसमोर मोटारसायकल थांबवत हाताने गाडी थांबविण्याचा इशारा केला. रेखा जरे यांनी गाडी थांबविली.

मोटारसायकल चालविणाऱ्याने डार्क ब्राउन रंगाचे लेदर जॅकेट घातलेले होते तर पाठीमागे बसलेल्याने ब्लॅक शर्ट, जिन्स, डोक्याला काळया रंगाचा गॉगल लावलेला होता. मोटारसायकल चालविणाऱ्याने गाडीजवळ येउन रेखा जरे यांच्याशी वाद घालण्यास सुरूवात केली. तुम्हाला गाडी चालविता येत नाही तर चालविता कशाला ? त्यावर तु गाडी निट चालव असे रेखा जरे म्हणाल्या. त्यावर त्या तरूणाने नाव विचारल्यावर मी रेखा भाउसाहेब जरे, यशस्वीनी महिला ब्रिगेडची अध्यक्ष आहे. त्याचे नाव विचारल्यावर त्याने नाव सांगितले नाही.

ब्राउन जॅकेटवाला वाद घालीत असताना काळा शर्ट घातलेल्या तरूणाने कोणाला तरी फोन लावला व म्हणाला की इनका क्या करना है ? थोडया वेळाने फोन ठेवल्यावर त्याने समोर येउन जरे यांच्या गाडीचा फोटो काढला. त्याच वेळी कुणाल याने काळा शर्ट परिधान केलेल्या तरूणाचा फोटा त्याच्या मोबाईलमध्ये काढला. फोटो काढून तो पुन्हा मोटारसायकलजवळ जाउन उभा राहिला. त्यानंतर ब्राउन जॅकेटवाल्या तरूणाने पुन्हा वाद घालण्यास सुरूवात करीत रेखा जरे यांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केला. त्यानंतर तो मोटारसायकलकडे धावला. काळया रंगाचा शर्ट घातलेल्या तरूणाने मोटारसायकल सुरू केली व ते नगरच्या दिशेने पळून गेले. गळयाला शस्त्र लागल्याने रेखा जरे ओरडत होत्या. त्या जखमी अवस्थेत असताना रस्त्यावरून जाणारे कोणीही मदतीसाठी थांबले नाही. विजयमाला व कुणाल यांनी जरे यांना ड्रायव्हिंग सिटवरून काढून दुसऱ्या सिटवर बसविले. तेथून विजयमाला यांनी गाडी चालवून सुपा टोलनाका इथपर्यंत ते आले. तेथून अॅब्युलन्सच्या मदतीने जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे रेखा जरे यांना डॉक्टरांनी मृत घोषीत केले होते, असे आरोप पत्रात नमूद असून पोलिसांनी ज्ञानेश्वर उर्फ गुडु शिवाजी शिंदे (श्रीरामपूर), फिरोज राजू शेख (राहूरी), आदित्य सुधाकर चोळके (कोल्हार बुद्रुक), सागर भिंगारदिवे व ऋषिकेश पवार (नगर) या पाच आरोपींविरोधात शुक्रवारी आरोपपत्र दाखल करण्यात आल्याचे वकील संकेत ठाणगे यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post