मंत्र्यांनी आदेश देऊनही पुतळे बसविण्याचा निर्णय प्रलंबित; संभाजी कदम यांनी वेधले लक्ष


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अहमदनगर शहरात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यांसंदर्भात मंत्र्यांनी आदेश देऊन प्रशासनाकडून हा विषय अद्याप प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर या दोन्ही पुतळ्यांबाबत त्वरित निर्णय होण्याची मागणी शिवसेनेचे माजी शहर प्रमुख संभाजी कदम यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.

अहमदनगर शहरातील सावेडीतील प्रोफेसर कॉलनी चौकात प्रस्तावित असलेला छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याबाबत महापालिकेत ठराव होऊन देखील मनपा प्रशासनाकडून योग्य कारवाई होत नाही. तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा शहरातील माळीवाडा परिसरात उभारण्याबाबतचाही निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत या दोन्ही विषयांवर चर्चा झालेली आहे. यासंदर्भात मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला तात्काळ पुतळ्यासंदर्भातील विषय मार्गी लावण्याचे निर्देश दिले आहेत. पुतळ्याच्यासंदर्भात स्थानिक पातळीवर जी समिती नियुक्त करण्यात आली आहे, त्यांनी हा विषय तात्काळ मार्गी लावणे गरजेचे आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेला तत्काळ सूचना देऊन बैठकीत ठरल्याप्रमाणे पुतळा परवानगीबाबतचा अहवाल हा नगरविकास खात्याकडे तत्काळ कशा पद्धतीने कशा जाईल, याबाबत संबंधित यंत्रणेला निर्देश द्यावेत, अशी मागणी माजी शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम यांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रति पोलीस अधीक्षक व मनपा आयुक्त यांना देण्यात आल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post