तपोवन रोडचे काम दर्जेदारच करून घेणार : विरोधी पक्षनेता संपत बारस्कर

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

तपोवन रोडचे काम कोणत्याही परिस्थितीत दर्जेदार करुन घेणार आहे. या रस्त्यासाठी आ. संग्राम जगताप यांनी राज्य सरकारकडून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुमारे साडे तीन कोट रुपये मंजूर करुन आणले. परंतु प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे काम दर्जेदार झाले नसल्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. आ. जगताप व आम्ही या रस्त्यांचे काम पुन्हा मजबुतीकरण व डांबरीकरण करावे यासाठी पाठपुरावा केल्यानंतर आज या कामाला सुरुवात झाली आहे. भिस्तबाग महालापासून ते औरंगाबाद महामार्गाला जोडणारा रस्ता आहे. या रस्त्याचे काम लवकरच पूर्ण होणार आहे, असे प्रतिपादन मनपा विरोधी पक्षनेता संपत बारस्कर यांनी केले.

तपोवन रोडच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामाची पाहणी करताना मनपा विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, बाळासाहेब बारस्कर, नगरसेवक सुनील त्रिंबके, विनित पाऊलबुद्धे, मा. नगरसेवक बाळासाहेब पवार, निखिल वारे, बांधकाम विभागाचे इंजि. रणदिवे, किसन कजबे, खंडू कजबे आदी उपस्थित होते.

यावेळी बारस्कर पुढे म्हणाले की, गेल्या २५ वर्षांपासून तपोवन रोडचे काम रखडले असल्याने या भागाचा दळवळणाचा प्रश्न गंभीर होता. हे काम मार्गी लावण्यासाठी आ. जगताप यांनी प्रयत्न केले असल्यामुळे मोठा निधी प्राप्त झाला. हा रस्ता पाईपलाईन रोडला पर्यायी रस्ता असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. मनमाड महामार्ग ते औरंगाबाद महामार्ग यांना जोडणारा हा रस्ता असल्यामुळे वाहतुकीचा मार्ग सुखकर होईल. या रस्त्यामुळे या भागाच्या विकासाला व विस्तारीकरणामध्ये भर पडणार आहे, असे ते म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post