एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
अहमदनगर जिल्ह्यात आज (सोमवारी) १७८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रविवारी सायंकाळी सहा वाजलेपासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २१९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ११९१ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ७३, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १४४ आणि अँटीजेन चाचणीत ०२ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३१, जामखेड ०३, कोपर गाव ०५, नगर ग्रामीण ०१, पारनेर ०३, संगमनेर १५, शेवगाव ०७, श्रीगोंदा ०८ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १३, अकोले ०९, कर्जत ०३, कोपरगाव ०६, नगर ग्रामीण १०, नेवासा ०३, पारनेर ०३, पाथर्डी ०२, राहाता १७, राहुरी ०२, संगमनेर २६, शेवगाव ०५, श्रीगोंदा ०२, श्रीरामपूर ०७ आणि इतर जिल्हा ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज ०२ जण बाधित आढळुन आले. नेवासा ०१, राहाता ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ५३, अकोले ०१, जामखेड ०५, कर्जत ०३, कोपरगाव ०६, नगर ग्रामीण १३, नेवासा ०२, पारनेर २९, पाथर्डी ०६, राहाता १९, राहुरी ०३, संगमनेर १५, शेवगाव ०२, श्रीगोंदा ०९, श्रीरामपूर ०८ आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेली रुग्ण संख्या : ७३७६५
उपचार सुरू असलेले रूग्ण : ११९१
मृत्यू : ११४४
एकूण रूग्ण संख्या : ७६१००
Post a Comment