भाजप आमदाराचा विधानसभेत आत्महत्येचा प्रयत्न

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

शुक्रवारी ओ़डीशा विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान एक हायव्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला. तांदूळ खरेदीच्या मुद्द्यावरून भाजप आमदाराने चक्क सॅनिटायझर पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुभाष चंद्र पाणीग्रही असे त्या आमदाराचे नाव असून ते ओडीशातील देवगढ मतदारसंघातून निवडून आलेले आहेत.

तांदूळ खरेदीच्या मुद्द्यावरून भाजप आमदार विधानसभेत आक्रमक झाले होते. त्याच वेळी सुभाष चंद्र यांनी सॅनिटायझर पिण्याचा प्रयत्न केला. मात्र संसदीय कामकाज मंत्री बिक्रम केशरी अरुखा आणि इतर आमदारांनी त्यांना रोखलं व त्यांच्या हातून सॅनिटायझरची बाटली काढून घेतली.

‘मी सॅनिटायझर पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कारण राज्य सरकारने माझ्य़ाकडे काही मार्गच ठेवला नाहीए. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांसकडे लक्षच देत नाही. सरकार बाजार समिती व टोकन सिस्टम बाबतचे शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्णच करू शकलेली नाही’, असा आरोप सुभाष चंद्र यांनी केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post