अहमदनगरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अहमदनगर जिल्ह्यात आज 362 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 76 हजार 705 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 95.91 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 452 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 2103 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 180, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 231 आणि अँटीजेन चाचणीत 41 रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 39, अकोले 03, जामखेड 04, कर्जत 12, कोपरगाव 14, नगर ग्रामीण 03, नेवासा 04, पारनेर 13, पाथर्डी 01, राहाता 29, राहुरी 01, संगमनेर 20, शेवगाव 03, श्रीगोंदा 04, श्रीरामपूर 28 आणि इतर जिल्हा 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 79, अकोले 06, जामखेड 04, कर्जत 05, कोपरगाव 17, नगर ग्रामीण 06, नेवासा 08, पारनेर 13, पाथर्डी 05, राहाता 35, राहुरी 02, संगमनेर 26, शेवगाव 01, श्रीगोंदा 01, श्रीरामपूर 18, इतर जिल्हा 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 41 जण बाधित आढळुन आले. मनपा 05, अकोले 01, जामखेड 01, नगर ग्रामीण 01, नेवासा 02, पारनेर 02, पाथर्डी 01, राहाता 05, राहुरी 09, श्रीगोंदा 02 आणि इतर जिल्हा 04 अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 152, अकोले 07, जामखेड 07, कोपरगाव 14, नगर ग्रामीण 18, नेवासा 11, पारनेर 13, पाथर्डी 10, राहाता 27, राहुरी 05, संगमनेर 29, शेवगाव 10, श्रीगोंदा 15, श्रीरामपूर 31, कन्टेंन्मेंट बोर्ड 6 आणि इतर जिल्हा 07 अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या :76705
उपचार सुरू असलेले रूग्ण : 2103
मृत्यू :1172
एकूण रूग्ण संख्या : 79980


(स्त्रोत : नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर)

Post a Comment

Previous Post Next Post