डाळी खाण्याचे तीन महत्त्वाचे नियम माहित आहेत का?

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

रोजच्या जेवणातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे डाळी आणि तृणधान्ये. मात्र, डाळी खाल्यामुळे गॅस, सूज किंवा पोटात गोळा येणे आणि बद्धकोष्ठते सारखे काही पाचन समस्या उद्भवू शकतात. याचा अर्थ असा नाही की आपण ते खाणे टाळले पाहिजे. कारण डाळी या आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचा स्त्रोत असतात.

सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर यांनी त्यांच्या चालू असलेल्या १२ आठवड्यांच्या फिटनेस प्रोजेक्टचा एक भाग म्हणून डाळी आणि तृणधान्यांचा समावेश करून संतुलित आहाराचे महत्त्व सांगितले आहे.

डाळी खाण्याचे तीन महत्त्वाचे नियम आहेत.

– स्वयंपाक करण्यापूर्वी डाळी भिजवा

– डाळी व धान्ये यांचा योग्य प्रमाणात तुमच्या आहारात समावेश करा.

– दर आठवड्यात किमान पाच प्रकारच्या डाळी / शेंगदाणे/ कडधान्य पाच वेगवेगळ्या स्वरूपात

डाळी खाणे का गरजेचे आहे?

– वृद्धत्वविरोधी – म्हणजेच अकाली वृद्धत्व दिसत नाही.

– हाडासाठी – डाळी खाल्यामुळे आपली हाड मजबूत राहतात.

– रोग प्रतिकारशक्ती – कोणत्याही रोगा पासून वाचण्यासाठी अॅन्टीबॉडीज तयार करण्यास मदत होते.

जर आपल्याला गॅस, सूज किंवा पोटात गोळा येणे आणि बद्धकोष्ठतेसारखे काही पाचन समस्यांपासून दुर राहायचे असेल. तर कोणत्याही प्रकारची डाळ ती तूरडाळ असो किंवा मूगडाळ असो सगळ्या डाळी शिजवण्या आधी थोडा वेळ भिजवून घ्या.

डाळ शिजवण्याआधी त्यात थोडी हळद, हिंग आणि थोड किसलेले आलं टाका. यामुळे फक्त डाळीला चव येत नाही तर यामुळे पाचनच्या सगळ्या समस्या दुर राहतात.

 

Post a Comment

Previous Post Next Post