एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आता युजरला पैसे कमावण्याची संधी देणार आहे. क्रिएटर्स शॉर्ट व्हिडीओ बनवून जाहिरातींद्वारे पैसे कमावू शकणार आहेत. यासाठी कंपनी योजना आखत असल्याची माहिती फेसबुक इंकने नुकतीच दिली आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, फेसबुकवरील युजर्स एक मिनिटापर्यंत व्हिडीओ बनवून पैसे कमावू शकतील. एका मिनिटाच्या व्हिडीओत कमीत कमी 30 सेकंदांची जाहिरात प्ले करणे आवश्यक आहे. तसेच तीन मिनिटे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीच्या व्हिडीओसाठी 45 सेकंदांची जाहिरात दाखवली पाहिजे. यापूर्वी केवळ तीन मिनिटे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीच्या व्हिडीओवर लोक जाहिरातींद्वारे पैसे कमावू शकत होते.
यासाठी युजर किंवा त्याच्या पेजवरील व्हिडीओला गेल्या 60 दिवसांत 6 लाख ह्यूज असण्याची आवश्यकता आहे. लाईव्ह व्हिडीओच्या नवीन जाहिरात सिस्टीमसाठी 60 हजार मिनिटांचे व्हिडीओ पाहिलेच पाहिजे, अशी कंपनीची अट आहे.
Post a Comment