कोरड्या खोकल्यापासून सांधेदुखीपर्यंत.. जाणून घ्या अक्रोड खाण्याचे फायदे


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

बऱ्याचदा आपण सुकामेवा खाताना केवळ काजू, बदाम, मनुके, पिस्ता हे खाण्यावर जास्त भर देतो. परंतु, सुक्यामेव्यातील अक्रोड हा कायमच दुर्लक्षित राहतो. खरं तर अक्रोड खाण्याचे असंख्य फायदे आहेत. कोरड्या खोकल्यापासून सांधेदुखीपर्यंत अनेक आजारांपासून दुर राहण्यासाठी अक्रोड आपल्याला मदत करते. चला जाणून घेऊया अक्रोड खाण्याचे फायदे…

– भाजलेले अक्रोड नियमितपणे खाल्याने शरीरातील ताकद वाढण्यास मदत होते.

– आजारपणात किंवा स्नायूंच्या अशक्तपणामध्ये अक्रोड खाणे चांगले असते.

– अक्रोडाची पावडर घ्या आणि त्यात दुध टाकून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्याला लावा. १० मिनिटानंतर चेहरा पाण्याने धुवा. यामुळे त्वचा तजेलदार वाटेल आणि चेहऱ्याचा ग्लो देखील वाढेल.

– अक्रोडच्या झाडाच्या सालातून तयार केलेली पेस्ट ही हिरड्या आणि दातांच्या इतर समस्यांवरील उपचारांसाठी वापरली जाते.

– तेलात अक्रोड फ्राय करा. त्यात चवीनुसार पिठी साखर घाला. हे दिवसातून दोन ते तीन वेळा खा. यामुळे कोरडा खोकला नाहीसा होईल.

– अक्रोडाच्या वाळलेल्या खोडाची साल घ्या, त्याची पावडर करा त्यात चिमूटभर लवंग मिसळून दंत पावडर म्हणून तुम्ही वापरू शकता.


हे अक्रोडचे फायदे आयुर्वेदिक डॉक्टर श्याम व्ही यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे सांगितले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post