एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सुत्रधार बाळ उर्फ बाळासाहेब जगन्नाथ बोठे यास हैदराबाद येथून जेरबंद करण्यात आले आहे. तसेच बोठे याला फरार असतांना मदत करणार्या आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. यात जर्नादन अकुला चंद्राप्पा, (रा.त्रिवेनी निवास, रामनगर, पी ऍण्ड टी कॉलनी, सारोमानगर, रंगारेड्डी,हैद्राबाद, तेलंगाना), पी.अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी, (रा. हैद्राबाद,तेलगाना (फरार),राजशेखर अंजय चाकाली (रा. गुडुर करीम नगर, मुस्ताबाद, आंध्र प्रदेश), शेख इस्माईल शेख अली (रा. खुबा कॉलनी, शाईन नगर, बालापुर,सरुरनगर, रंगारेड्डी, आंध्रप्रदेश(तेलंगाना), अब्दुल रहमान अब्दुल आरीफ (रा. चारमीनार मस्जीद, पहाडी शरीफ, सुरुर नगर, रंगारेड्डी, आंध्रप्रदेश. (तेलंगाना) आणि महेश वसंतराव तनपुरे (वय 40 वर्षे, धंदा व्यवसाय, रा. कुलस्वामीनी गजानन हौसिंग सोसायटी, नवले नगर, गुलमोहर रोड, सावेडी, अहमदनगर) यांचा समावेश आहे.
पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके, पोलीस निरीक्षक यादव, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, महिला पोलीस निरीक्षक गडकरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सानप, मिथुन घुगे, दिवटे, पोलीस उप निरीक्षक समाधान सोळंके, पोहेकॉ रविंद्र पांडे, रविकिरण सोनटक्के, दिपक शिंदे, राहुल गुंड,अभिजीत अरकल, जयश्री कुंदे, संतोष लोढे, गणेश धुमाळ, भुजंग बडे, सचिन वीर, सत्यम शिंदे, चौगुले, मिसाळ, सानप, रणजीत जाधव, बुगे, जाधव, दातीर, प्रकाश वाघ, राहुल डोळसे व रितेश वेताळ यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
Post a Comment