…म्हणून दिवसातून एक केळे खा!


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

आपल्या सगळ्यांना माहित आहे की, तुम्हाला कधी अचानक खूप कंटाळा आला आणि काही खाण्याची इच्छा झाली. पण आपल्याला असं काहीतरी खाण्याची इच्छा असते ज्यातून जास्त कॅलरीज मिळणार नाही. तर तेव्हा तुम्ही केळे खाऊ शकतात. केळे ही आपल्या आरोग्यासाठी चांगल्या असणाऱ्या फळांपैकी एक आहे. केळ्यात अँटीऑक्सिडंट्स, पाण्याचे आणि फायबरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. पण अनेकांना माहित नाही की केळे खाल्याने अन्नपचन होण्यास मदत होते. चला जाणून घेऊया केळे खाण्याचे फायदे…

केळे घेताना कोणतं केळे घेतलं पाहिजे?
पचनासाठी सगळ्यांत चांगली केळी ही पिवळी आणि ज्याच्या सालीवर तपकिरी रंगाचे छोटे छोटे ठिपके असतात. ती केळी सगळ्यात चांगली असते.

केळे सगळ्यात चांगल का आहे?

– केळे खाल्याने आपल्या आतड्यांमध्ये बॅक्टेरिया जास्त काळ राहत नाही.

– केळ्यात अॅंटीवायरल मोठ्या प्रमाणात आहे. या अॅंटीवायरलमुळे आपल्या शरीरात बॅक्टेरियाची वाढत होत नाही.

– केळीमध्ये अॅंटीफंगल गुणधर्म आहेत.

– आपल्या आतड्यांना कोणताही त्रास न देता केळी पचनास सोपी आहे.

– जठर आणि आतड्यांमध्ये होणारी आग केळे खाल्याने कमी होते.

केळे खाण्याचे हे सगळे फायदे मेडिकल मीडिया या इन्स्टाग्राम पेजचे लेखक विल्यम यांनी सांगितले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post