पत्नीवर अघोरी विद्येचा प्रयोग; उद्योजक पिता-पुत्रांवर मोक्का!


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज


पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातील उद्योजक नाना गायकवाड आणि त्यांचा मुलगा गणेश गायकवाड याच्यासह पाच जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पत्नीला शाररिक आणि मानसिक त्रास देणे, जमीन बळकावणे यासह इतर गुन्ह्यात आरोपी असलेला गणेश गायकवाड आणि त्याचे वडील नाना गायकवाड यांच्यासह त्यांच्या साथीदारांविरोधात पिंपरी चिंचवड पोलीस आयुकतालयाकडून मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

नाना गायकवाड आणि गणेश गायकवाड यांच्यावर एकूण आठ गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये दंगा करुन खुनाचा प्रयत्न करणे, गुलाम बनविण्याच्या इराद्याने अपहरण करुन मारहाण करणे, कट रचून बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक करणे, खंडणी उकळण्यासाठी मारहाण करणे, दरोडा घालणे अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. संबंधित गुन्हे हे पिंपरी चिंचवडमधील हिंजवडी, सांगवी, पुणे शहरातील चतुर्श्रुंगी, चंदननगर आणि पुणे ग्रामीण पौड पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत.

सर्व आरोपींनी संघटित गुन्हेगारी टोळी बनवून हिंसाचाराचा वापर करत वर्चस्वासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी संघटीतपणे गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post