सर्प परिचय : 'इंडियन कोब्रा' विषयी 'हे' माहिती आहे का?


एएमसी मिरर वेब टीम

ऑनलाईन न्यूज 

साप हा निसर्गचक्रातला महत्त्वाचा घटक आहे. आपल्या सभोवताली त्याचे वास्तव्य आढळते. सापांविषयी जनमाणसात असणारे समज-गैरसमज, अंधश्रद्धा त्यांच्याविषयी असणारे अज्ञान यामुळे साप म्हटलं तरी भीतीने गाळण उडते. शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या या सापांविषयी माहिती व्हावी व आपल्या घरात किंवा परिसरात साप दिसला तरी तो विषारी आहे की बिनविषारी आहे, हे चटकन ओळखता यावे, या हेतूने अहमदनगर येथील निसर्ग मित्र व छायाचित्रकार मंदार साबळे यांनी 'सर्प परिचय' हे पुस्तक प्रकाशित केले आहे. त्यातील माहिती आम्ही आपणासमोर घेऊन येत आहोत.

साप हा मानवाचा मित्र आहे. प्लेगसारख्या प्राणघातक रोगाचा प्रसार करणाऱ्या व लाखो टन धान्याची, घरातील चीजवस्तूंची नासाडी करणाऱ्या उंदरांचा त्यांच्या बिळात जाऊन नायनाट करणारा साप हा पृथ्वीतलावरचा एकमेव प्राणी आहे. अनेक दुर्धर रोगांच्या औषधनिर्मितीमध्ये विषारी सापांच्या विषाचा उपयोग केला जातो. साप हा पूर्णतः मांसाहारी प्राणी आहे. अजगरासारख्या सापांच्या खाद्यात उंदीर, घुशीपासून ते हरणापर्यंतच्या प्राण्यांचा समावेश होतो. इतर साप उंदीर, बेडूक, पाल, सरडे, छोटे पक्षी, त्यांची अंडी व इतर लहान साप खाऊन आपली गुजराण करतात. सापांमध्ये काही साप अंडी घालतात, तर काही पिलांना जन्म देतात. अंड्यातून पिलू बाहेर पडण्यास साधारणः तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागतो. पिलांना जन्म देणारे साप एकावेळी सरासरी २५ ते ७५ पिलांना जन्म देतात. अशा या विविध जाती-प्रजातीच्या सापांची माहिती आपण पाहुयात..

नाग : इंडियन कोब्रा (विषारी)

लांबी- साडेपाच ते सात फूट

वास्तव्य - शेती, माळराने, अडगळीची ठिकाणे तसेच शहराची मध्यवस्ती वगळता सर्वत्र आढळतो.

खाद्य - उंदीर, बेडूक, इतर साप, सरडे, पक्षी व त्यांची अंडी

प्रजनन - मादी दहा ते पंधरा अंडी

(यास डिवचले असता फणा उभारून हा फुसऽऽफुसऽऽ असा आवाज करतो.)

लेखक व छायाचित्रकार

मंदार साबळे, अहमदनगर

1 Comments

  1. Casino Restaurants in North Carolina - Mapyro
    Find Casino Restaurants in North Carolina in North Carolina, including restaurants from Top Scores! 제주도 출장샵 Find your nearest and best 용인 출장마사지 to enjoy! 사천 출장샵 MapYRO 당진 출장마사지 has a large 고양 출장안마 selection of

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post