हिवाळ्यात ओठ फाटण्याच्या समस्येने तुम्ही हैराण आहात का? करा ‘हे’ घरगुती उपाय


एएमसी मिरर वेब टीम 

ऑनलाईन न्यूज 

चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यात ओठ महत्त्वाची भूमिका बजावतात, त्यामुळे त्यांची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे असते. हिवाळ्यात कोरडे वातावरण आणि थंड हवेमुळे ओठांची आर्द्रता नष्ट होऊन ते लवकर कोरडे होतात, त्यामुळे ओठ फाटतात. काही वेळा ओठातून रक्तही येऊ लागते. म्हणूनच विशेषतः हिवाळ्यात ओठांची योग्य काळजी घ्यावी लागते. सॉफ्ट लाल ओठ सर्वांनाच आवडतात. जर तुम्हालाही हिवाळ्यात ओठ फुटण्याची समस्या भेडसावत असाल तर ते घरगुती उपायांनी दूर होऊ शकतात.

हळद

औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली हळद आरोग्यासाठी फायदेशीर तर आहेच, पण त्यामुळं फाटलेल्या ओठांच्या समस्येपासूनही सुटका मिळते. जर तुमच्या फाटलेल्या ओठातून रक्त येत असेल तर दोन चिमूट हळदीमध्ये एक चतुर्थांश चमचे दूध मिसळा. आता ही पेस्ट रोज रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर लावा. या उपायाचा नियमित अवलंब केल्यास काही दिवसातच तुमचे ओठ लाल आणि सॉफ्ट होऊ शकतात.

नारळाचे तेल

नारळाचे तेल ओठ फाटण्याच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी देखील प्रभावी आहे. यासाठी दिवसभरात २ ते ३ वेळा ओठांवर खोबरेल तेल लावा. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही तुमच्या ओठांना खोबरेल तेलाने मसाज करू शकता. यामुळे तुमच्या ओठांची त्वचा तर मऊ होईलच पण वेदनेतही आराम मिळेल.

मलाइ वापरा

फाटलेल्या ओठांवरही मलाइ प्रभावी ठरू शकते. यासाठी रोज झोपण्यापूर्वी तुमच्या फाटलेल्या ओठांवर मलाइ लावा. दोन मिनिटे ओठांना मसाज केल्यानंतर असेच राहू द्या. काही तासांनी चेहरा धुवा.

ऑलिव्ह ऑईल आणि साखर

दोन चमचे चूर्ण साखर एक चमचे ऑलिव्ह तेल आणि एक चमचा व्हॅसलीनमध्ये मिसळा. ऑलिव्ह ऑइलमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात, ते त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन ई ओठांना सुंदर बनवते.

Post a Comment

Previous Post Next Post