ऑनलाईन न्यूज
रशिया-युक्रेनचा भडका विदारक स्थितीत पोहचला आहे. रशियाचे सैनिक युक्रेनेच्या राजधानी कीवमध्ये शिरले आहे. भारतातील सुमारे १८ हजार लाेक युक्रेनमधील वेगवेगळ्या राज्यात अडकली आहेत. त्यात अहमदनगरमधील विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे. या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना व्हिडिओ पाठवत युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थिती चिंताजनक असून भारत सरकारकडे मदतीची मागणी केली आहे.
अहमदनगरमधील साक्षी बाेराटे, किरण माेरे आणि पुण्याच्या याेगीता काळेचे व्हिडिओ समोर आले आहेत. याेगीता काळे ही युक्रेनमधील झॅपरेझिया विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेत आहे. युद्धामुळे बाजारपेठेत अस्थिरतेचे वातावरण आहे. चलनाचे दर वाढले आहेत. एटीएम केंद्राबाहेर रांगा लागल्या असून, भारतीय एटीएम देखील बंद पडत चालले आहेत. खाण्या-पिण्याचे हाल सुरू झाल्याचे सांगून तिने मदतीची मागणी केली आहे.
किरण माेरे हा देखील झॅपरेझिया विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेत आहे. त्याचाही व्हिडिओ समाेर आला आहे. युद्धामुळे दुतावासाकडून युक्रेन देश साेडून भारतात परतावे, अशा सूचना देण्यात आल्या हाेत्या. परंतु युक्रेन सरकारने राष्ट्रीय आणीबाणी घाेषित केली. तसेच कीव, ओडिसा, खारकी आणि व्हिनीतशिवा विमानतळावर स्फाेट झाल्याची माहिती मिळत असल्याचे ताे सांगताेय. विमानसेवा विस्कळीत झाली आहे. जवळजवळ बंदच झाली आहे.
विद्यापीठाकडून वेगवेगळ्या सूचना येत आहे. त्यात स्थलांतराची सूचना आहे. नेमके काय करावे हे सूचत नाही. चलनासाठी भारतीय कार्ड येथे चालत नाही. बाजारपेठेत खरेदीसाठी रांगा लागल्या आहेत. पेट्राेल पंपासह अनेक माॅल्समध्ये रांगा आहेत. राष्ट्रीय आणीबाणीमुळे जीवनावश्यक वस्तूंचा साठेबाजार सुरू झाला आहे. या परिस्थिती कागदपत्रे तयार ठेवा, अशाच सूचना विद्यापीठाकडून मिळत आहे. विदारक परिस्थिती असून, भारत सरकारने आम्हाला या युद्धजन्य परिस्थितीतून बाहेर काढावे, अशी मागणी त्याने केली आहे.
👉 असेच अपडेट मिळविण्यासाठी 9511257335 हा क्रमांक आपल्या व्हॉटसअॅप ग्रुपमध्ये समाविष्ट करा.
Post a Comment